विद्यालय व शाळा

स्मृति गंधर्वाँची - " गाथा बालगंधर्व विद्यालयाची "
  

  • महात्मा फुल्यांच्या शैक्षणिक वारसा पुढे चालवण्याचे कार्य करणाऱ्‍या अनेक छोट्या-मोठ्या संख्या महाराष्ट्रात कार्य  करु लागल्या.  वैकुठवासी वि. स. पागे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष ज्यांनी राष्ट्राला रोजगार हमी योजना दिली.  त्यांच्याच प्रेरणेने सन १९६६ - ६७ साली तासगाव व नागठाणे या दोन ठिकाणी नवी ज्ञानकेंद्रे सुरु झाली.


  • त्यातील नागठाणे येथील ज्ञानकेंद्र नाट्य-सम्राट - अभिनयाचा - कलेचा राजहंस असणाऱ्‍या तत्कालीन नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे नावे चालू करून बालगंधर्वांचा 'खरा गौरव त्याच वेळी संस्थेने केला'.

  • "जीवन विकास संस्था" या संस्थेच्या नावातच लोकजीवनाचा विकास व्हावा संपन्न आदर्श नागरीक घडावा हे पायाभूत उद्दिष्ट मानून शाळेची स्थापना केली.  बालगंधर्वांच्या नावामुळे या शाळेला राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते.  प्राथमिक काळात १५ ते २० वर्षे शाळा गावकऱ्‍याच्या इमारतीत चालली. " श्री. पांडु नाना पाटोळे, श्री. जनार्दन पाटील, श्री. लक्ष्मन तात्या कुलकर्णी, श्री. आप्पासो थोरात, श्री. गजानन शिंदे, श्री. कोंडीबा पवार " अशा अनेकांनी प्रतिकुल काळात सहकार्य करून शाळा टिकवली. शाळेसाठी मनापासून झटणारा शिक्षकवर्ग लाभला त्यामुळे प्रगतीची पावले पुढे सरकली.


  • मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक ट्रस्ट मधून १५ लाखाचे अर्थ सहाय्य मिळाले. संस्थेच्या शिक्षकांच्या व शिक्षणप्रमी नागरिकांच्या सहाय्याने आज १० खोल्यांची इमारत पुर्ण आहे ५ खोल्यांचे बांधकाम चालू आहे.


  • शाळा बालगंधर्वाँचे पहिले व स्थिर स्मारक म्हणून ओळखावे लागेल या ज्ञानस्मारकास सर्व गावकर्ऱ्‍यांनी अधिक भव्य करण्याची गरज आहे.


मुख्याध्यापक , पर्यवेक्षक व सर्व शिक्षक वर्ग


 मुख्याध्यापक - श्री. गुरव एम्. ए.
पर्यवेक्षक - श्री. आसगेकर पी. आर.
  
  • बालगंधर्व विद्यालयात आज इयत्ता ५ वी ते १० वी  प्रत्येकी २ तुकड्या असे १२ वर्ग असून शिक्षक शिक्षकेतर २५ सेवक कार्यरत आहेत. जुन २०१० मध्ये शाळेचा पट ५४० आहे. शाळेने बैधिक व स्पर्धा गटात ही उज्वल यश मिळवले आहे. यंदाच्या एस एस सी बोर्डांचा शाळेचा निकाल ८१ % असून ९० % गुणाचा प्रथम क्रमांक आहे. ६०% हून अधिक गुण मिळवणाऱ्‍या विद्यार्थ्याँचे प्रमान ७० % आहे. शाळेने क्रिडा व विज्ञान स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. कृष्णा काठच्या सधन परिसरात मजूरासाठी आलेल्या मजूर वर्गातील मुलांचाही शाळेत सहभाग असतो. अशा श्रमजीवी पाल्यांची संख्या १०० हुन अधिक आहे. श्याम येडेकर या सारखे नाकरीक दत्तक पालक योजनेत सहभाग घेवून प्रतीवर्षी १० हजार रुपयापर्यँतची गरीब गरजू मुलांना मदत करतात. सधन नागरिकांची सत्पायी दान करण्याची गरज आहे. शासनाचे अनुदान नसताना आज शाळा चालवणे त्रासाचे होत असताना धनिकानी पुढे येवून या ज्ञानमंदीरात योगदान द्यावे अशी शिक्षकांची अपेक्षा आहे.


 प्रार्थना व परिपाठ करीत असताना विद्यार्थी



प्रार्थनास्थळ
  •  जागतिक किर्तिचा कलावंत नाट्यकलेचा मेरुमणी स्री-भुमिकांचा अनोखा वारसा कलेत आणणाऱ्‍या बालगंधर्वाचे हे ज्ञानस्मारक भव्य व्हावे, इथे कलेचे ज्ञान मिळावे. देशभरातील कलाशिक्षणाचे एक आगळे वेगळे केंद्र झाले आणि उद्याचे गंधर्व जन्माला आले तरच गंधर्वांना खरी आदरांजली ठरेल. असे मनोमन वाटते अशा कलास्वर्गाच्या प्रांगणात ज्ञानफुले देताना आम्हास आनंद वाटतो एवढाच भाव इथला शिक्षक वर्ग व्यक्त करीत आहे....

 
 शाळेतील विद्यार्थीँनी मिळालेले बक्षिसे व शिंल्ड्स



जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उपकरनाची निवड झाली व त्यांच्या सोबत मा. श्री. जयंतराव पाटील.

===============================================================
 

माध्यमिक विद्यालय, नागठाणे


माध्यमिक विद्यालय सर्व शिक्षक वर्ग, नागठाणे



  
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थीँनीना बक्षिसे मिळाले.

No comments:

Post a Comment